खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- सालाबाद प्रमाणे खानापूर तालुक्यातील मेंढेगाळी येथे सोमवार दि 27 नोव्हेंबर रोजी “एक गाव एक तुळस” परंपरेप्रमाणे सामूहिक तुलसी विवाह तसेच येथील ग्रामदेवता कालिका देवीची यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या तुळशी विवाह कार्यक्रमाच्या निमित्ताने रात्री 10 वाजता खैरवाड येथील शिवाजी भजनी भारुडाचा बहारदार भारुड कार्यक्रम होणार आहे. या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सोमवारी सकाळी देवीचा अभिषेक, दुपारी 1 ते 5 पर्यंत ओट्या भरणी कार्यक्रम तर सायंकाळी 5 वा. नंतर स्थळ देवस्थानकडे भजनी मंडळ व ग्रामस्थ प्रस्थान होणार आहेत. त्यानंतर तेथील धार्मिक विधी होऊन पुन्हा रात्री 7 वाजता श्री कालिका देवीची महाआरती होईल. त्यानंतर रात्री आठ ते नऊ या वेळेत नवसाला पावणारी तुळशी देवीचा विवाह सोहळा होणार आहे. त्यानंतर सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर भजनी भारुडाचा कार्यक्रम होईल.
मंगळवारी खुल्या डान्स स्पर्धांचे आयोजन
- श्री कालिका देवी तसेच श्री तुळशी विवाह उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 28 रोजी सायंकाळी सहा वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धे करिता विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रु 15551, 11559, 7551, 4559, 2559 अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
- या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, हल्ल्याळ भागाचे नेते, माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत घोटनेकर, म ए समिती कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष मंदा पठाण, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य नाझिया सनदी, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गावडा आदि ना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ सार्वजनिक आणि घ्यावा असे आवाहनश्री कालिका देवी कमिटी ग्रामस्थ मंडळी मेंढेगाळी, यांच्यावतीने करण्यात आले आहे.