खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: जनावरांसाठी बांधण्यात येत असलेल्या गोट्याच्या छतावर पत्रे चढवण्याचे काम करत असताना अचानक पाय घसरून पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील कौंदल येथे घडली आहे. सदर युवकाचे नाव अनंत मारुती कुरुमकर 39 असे आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, कौंदल गावात नेहमी फॅब्रिकेशन चे काम करणारे अनंत कुरुमकर हे छतावर काम करत असताना अचानकपणे त्यांचा तोल जाऊन खाली पडल्याची महिती उपलब्ध झाली आहे . त्याच्या पश्चात आई ,पत्नी, दोन मुले ,भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेचा खानापूर पोलीसांनी पंचनामा केला आहे . सदर युवकाचा मृत्यु पडून झाला की दुसरे कोणते कारण असावे याचे कारण शवविच्छेदन झाल्यानंतर कळणार आहे.