बिहार: वाळूला काळं सोनं म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे वाळू माफिया वाळू उपसण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मागच्या काही दिवसांपूर्वी वाळू माफियांनी देशभरात उच्छाद मांडला आहे. त्यांना लगाम लावण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अशातच बिहारमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सोमवारी अशाच प्रकारे गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अशा अवैध धंद्यावर नजर ठेवून ड्युटी करत असताना एका वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला प्रयत्न केला. पण त्या चालकाने वाळूचा ट्रक न थांबवताच गस्तीवर असलेल्या त्या दोन पोलिस (Police) अधिकाऱ्यांच्या अंगावरच ट्रक घालून त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडलं. या घटनेत पोलीस एका अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. प्रभात रंजन असं मृत्युमुखी पडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रभात रंजन यांना सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहे. पोलिसांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रंजन हे जमुई जिल्ह्यातील गढी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत होते. सोमवारी सकाळच्या सुमारास ते पोलीस कर्मचारी राजेश कुमार साह यांच्यासोबत गस्तीवर होते. यावेळी प्रभात रंजन यांना अवैध्य वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर दिसून आला. त्यांनी ट्रॅक्टर थांबण्याचा प्रयत्न केला, मात्र, वाळू माफियांनी ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घातला. व तेथून ट्रक घेऊन त्याने पोबारा केला.