- खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
- हलगा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरुण ए .पाटील यांना नुकताच नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन तसेच हेल्थ नेचर फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. बेळगाव येथील धर्मनाथ भवन मध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक अरूण पाटील हे 1994 पासून शिक्षक म्हणून सेवेत आहेत. आज तागायत त्यांनी दोडेबैल, गरबेनहट्टी, खैरवाड, माणिकवाडी अनेक शाळांमध्ये आपली प्रामाणिक सेवा बजावत आली आहे.
- 2020 मध्ये त्यांची बढती मुख्याध्यापक म्हणून हलगा शाळेत बदली झाली. मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना या शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी विशेष परिश्रमा हाती घेतले आहेत. 2023 मध्ये त्यांची गोवा हर्मल पंचक्रोशीतील संस्थेच्या वतीने विविध राज्यातील निवडक शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. अरूण पाटील यांना गोवा येथील या संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला होता. खानापूर तालुका शिक्षक संघाच्या वतीने त्यांना शिक्षक देऊन पुरस्कारीत करण्यात आले. एक प्रामाणिक व हाडामासाचे शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या शैक्षणिक सेवेतील कार्याची दखल घेता इंटरनॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन तसेच हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने कर्नाटक गोवा महाराष्ट्र प्रांतातील अनेक निवडक शिक्षकांच्या मधून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला त्यामध्ये यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अरुण पाटील यांची निवड करण्यात आली व त्यांना हा सदर संस्थांच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. यावेळी सदर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. अभिनंदन होत आहे.