- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी; दीपावलीच्या निमित्ताने खानापूर तालुका शर्यत कमिटीच्या वतीने आज गुरुवार दि. 2 नोव्हेंबर व शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. सदर शर्यत खुल्या गटासाठी एका बैलगाड्याची चाकी न बनता बैलगाडा बैल जोडीने पळवण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे शर्यतीचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुका शर्यत कमिटीचे अध्यक्ष नारायण कारवेकर राहणार आहेत.
- शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या पाठीमागील मैदानावर आयोजित या शर्यतीमध्ये अनुक्रमे 41000, 31000,25000,21000,18000 अशी एकूण 25 बक्षिसे ठेवण्यात आली आहे. सदर शर्यत फक्त दोनच दिवस चालणार असून बैलजोडी मालकानी व शर्यत प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शर्यत कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 91 64 10 38 42 किंवा 94 81 91 27 32 या क्रमांकाची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.