खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- दि सह्याद्री मल्टी पर्पज को-ऑप. सोसायटी लि., बेळगाव (मल्टी- स्टेट) शाखा खानापूर सन २०२३-२०२४ साला करिता अध्यक्ष उपाध्यक्ष निवड करण्यात आली. आगामी कालावधीसाठी महापूर शाखा सल्लागार अध्यक्षपदी श्री मोहिदीन अ. दावनगिरी खानापूर, यांची तर उपाध्यक्ष पदी श्री सुर्याजी स. पाटील जळगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाखा सल्लागार मंडळाची बैठक सह्याद्री सोसायटी बेळगावचे संचालक श्री शिवाजी कृष्णा कदम त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली व आगामी कालावधीसाठी उभयतांची अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी खानापूर शाखेचे सल्लागार व्ही. बी. होसुर , सुरेश बडकू किनेकर , शिवराज नारायण पाटील , तुकाराम कृष्णा कुलम , तुळजाराम गणेश गुरव , शाखा व्यवस्थापक कल्लाप्पा पाटील व कर्मचारी वर्ग आणि पिग्मी संकलन उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल शाखा सल्लागार मंडळ यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.