खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून एक नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी आधी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्र पासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डाबण्यात आल्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय झाला आहे. गेल्या 67 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे परंतु कर्नाटक सरकार गेल्या 67 वर्षापासून आपल्या घटनात्मक न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मराठी जनतेवर अनेक अत्याचार करून मराठी भाषिकांची मागणी पायदळी तुडवीत आहे. सीमा भागातील मराठी दिवसेंदिवस कमी होत चालल्याने आज भाषा जगवण्यासाठी व जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठी माणसाचा जागा हो! आणि समितीचा धागा हो.! असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात येत आहे येत्या एक नोव्हेंबर काळयादिनाचे अवचित साधून कडकडीत हरताळ पाळण्यासाठी गावागावात जागृती अभियान व परिपत्रिकाचे वितरण करण्यात येत आहे.
कर्नाटक सरकारने सीमा भागातील मराठी भाषा व संस्कृती संपवण्याचा चंग बांधला आहे. मात्र येथील मराठी भाषिक जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा अध्यापही कायम असून सीमा भागातील मराठी जनता दरवर्षी बेळगाव सह सीमा भागात 1 नोव्हेंबर या दिवशी काळा दिन पाळून सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करते. यावर्षी देखील एक नोव्हेंबर या काळ्या दिनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बुधवारी नंदगड येथे गुरुवारी माडीगुंजी येथे तर शुक्रवारी जांबोटी येथे पत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली व काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले
या जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म ए समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई म ए समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील म ए समिती जाबोटी विभाग उपाध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस जयराम देसाई म ए समितीचे नेते माजी सभापती मारुती परमेकर यांच्यासह खजिनदार संजीव पाटील राजाराम देसाई शंकर सडेकर विठ्ठल देसाई राजू चिखलकर प्रभाकर बिरजे प्रताप देसाई मारुती देसाई बाळासाहेब देसाई भैरू मुतगेकर सातेरी देसाई मानू कोळपटे तुटला तुबला रामा हा नंबर शिवाजी दळवी सुबराव देसाई शिवाजी साडेकर जयवंत घाडी विठ्ठल राजगोळकर यांच्यासह बहुसंख्य मराठी भाषिक सहभागी झाले होते.
तर नंदगड येथे अध्यक्ष गोपाळ देसाई पुंडलिक मामा चव्हाण ,मुरलीधर पाटील,आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, रवींद्र शिंदे,जयराम देसाई, रणजित पाटील, मारुती दे गुरव,डी. एम.गुरव , भरत पाटील, पुंडलिक पाटील, एम.पि. पाटील, विठ्ठल गुरव, ब्राह्मनंद पाटील ,तुकाराम फटाण , एम जि पाटील, तुकाराम जाधव,मधू फटाण,तसेच मराठी भाषिक उपस्तित होते
माडीगुंजी येथे अध्यक्ष गोपाळ देसाई ,राजाराम द देसाई, दीपक देसाई,आबासाहेब दळवी, राजाराम देसाई, रवींद्र शिंदे,जयराम देसाई, रणजित पाटील, मारुती दे गुरव, गोपाळ हेबाळकर, भरत पाटील, पुंडलिक पाटील, एम.पि. पाटील, तुकाराम गोरल, के वाय चोपडे, शंकर गावडा,तसेच मराठी भाषिक उपस्तित होते