- खानापूर, ता. १६ खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची १ नोव्हेंबर ‘काळा दिना’निमित्त बैठक सोमवारी (ता. १६) शिवस्मारक येथील सभागृहात झाली. काळ्या दिनानिमित्त शिवस्मारक येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी परवानगी मिळो अथवा न मिळो लाक्षणिक उपोषण करणारच, असा निर्धार बैठकीत करण्यात आला
- देसाई यांनी यावेळी दिली. टोप दरवर्षीप्रमाणे १ नोव्हेंबर या त दिवशी सीमाभागात काळा दिन के कडकडीत पाळण्यात येतो. त्याची वड रुपरेषा ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात ता आली. १९५६ पासून ते आजपर्यंत हा लढा निरंतर व लोकशाही मार्गाने चालू आहे. सध्या सीमाप्रश्न हा न्यायालयात असला तरी याबाबत केंद्र सरकारला मराठी अस्मितेची जाणीव करण्यासाठी १ नोव्हेंबर हा दिवस सीमाभागात काळा दिन पाळला जातो. यासाठीच खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीने सुद्धा या दिवशी सकाळी दहा ते चारच्या दरम्यान शिवस्मारक येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. या दिवशी दुपारी एक वाजल्यानंतर नेत्यांची व उपस्थितांची भाषणे होणार आहेत. यासाठी आपण रीतसर प्रशासनाची परवानगी घेणार असल्याचे गोपाळराव या असल्याची माहिती अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी सांगितले.
- या बैठकीला मुरलीधर पाटील, रणजीत पाटील, जयराम देसाई, कृष्णा कुंभार, कृष्णा मनोळकर, रमेश धाबले, मारुती गुरव, संजीव पाटील, पांडुरंग सावंत, डी. एम. भोसले, बाळासाहेब शेलार, शंकर गावडा, रमेश देसाई, अजित पाटील, जगन्नाथ देसाई, रवींद्र शिंदे, गोपाळ पाटील, फकीरा सावंत, जयसिंगराव पाटील, आर. एस. देसाई व समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात जनजागृती
- काळ्या दिना’साठी तालुक्यातील युवकांना एकत्र करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. यासाठी जनजागृती गरजेची असल्याचे कार्याध्यक्ष निरंजनसिंह देसाई यांनी सांगितले. यासाठी पत्रके व समाज माध्यमाचा वापर करून काळा दिन कडकडीत पाळण्याचे ठरविण्यात आले. खानापूर शहर लोंढा, जांबोटी, गर्लगुंजी व नंदगड परिसरात येत्या काही दिवसात पत्रके वाटून जनजागृती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासाठी गावागावांत पदाधिकारी भेट देऊन जनजागृती करणार आहेत.