- खानापूर लाईव्ह न्युज/प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्याच्या जंगल व डोंगर कपारीच्या पट्ट्यात जंगली हिंस्त्र प्राण्यांचा वावर अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे माणसाबरोबर आता जंगली प्राण्यांनाही मुकावे लागत आहे. कधी अस्वलाने मानवावर कधी वाघ बिबट्याने प्राण्यावर आले केल्याचे प्रकार दिसून येत आहेत. अशाच प्रकारे नंदगड नजीक काल सायंकाळी चरावयास सोडलेल्या एका गाईवर जंगली हीस्त्र प्राण्याने हल्ला करून गाय ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. सदर गाईच्या मालकाचे नाव सुरेश रामगुरवाडी असे असून येथील नंदगड ड्याम बाजूला त्याची शेती असून आपली पाळीव जनावरे त्याने सोमवारी चराव्यास घेऊन गेला होता. पण रात्री उशिरापर्यंत गाय परतली नसल्याने त्यांनी शोध केला असता जंगलात गाय बळी पडल्याचे दिसून आले. पण गाईवर हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला. याचे कारण कळले नाही. मंगळवारी सकाळी वनखात्याचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली आहे.