Screenshot_20231016_123105
  • खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : रामनगर – धारवाड मार्गावरील नागरगाळी नजीक असणाऱ्या फॉरेस्ट विश्राम धामा जवळ बेंगलोर हून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका 407 टेम्पोची झाडाला धडक बसल्याने त्यामध्ये एक 19 वर्षीय बस चालक जागीच ठार झाला आहे तर दुसरा आणखी एक अपघात याच मार्गावर मुंडवाड नजीक के एस आर टी सी बस पलटी झाल्याने एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे.
  • याबाबत मिळालेली माहिती की धारवाडून गोव्याच्या दिशेने मेडिकलची सामग्री घेऊन जाणारी 407 टेम्पो क्रमांक KA53 AA 0775 सोमवारी सकाळी आठच्या दरम्यान बाजूच्या झाडाला धडकल्याने यामधील चालक सय्यद निजाम वय वर्ष 19 राहणार बेंगलोर जागीच ठार झाला. त्याच्याबरोबर असणारे माझ शेख वय वर्षे 19 तसेच तोहीर शेख वय वर्ष 19 दोघेही राहणार बेंगलोर हे जखमी झाले आहेत. तर टेम्पो चालक निजाम सय्यद हा वाहनातच अडकून पडला असून घटनास्थळी क्रेन तीन च्या साह्याने त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत .
  • तर याच मार्गावर असणाऱ्या मुंदवाड क्रॉस नजीक सोमवारी पहाटे चार वाजता बल्लारी पणजी ही के एस आर टी सी ची बस पलटी झाल्याने यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. सुदैवाने आणखी कोणालाही मोठी दुखापत झाली नाही सदर दोन्ही घटना लोंढा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्या आहेत. पोलीस घटनेचा पंचनामा करत आहेत.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us