खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्याच्या मध्यातून जाणाऱ्या मलप्रभा नदीवरील पाणी अडवण्याचे बंधारे बांधणी केली जात नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात झिरपण होऊन उन्हाळ्यात पाणी कमी पडत आहे. मागील वर्षी सदर पाणी अडवण्याचे काम निष्कृष्ट झाल्याने उन्हाळ्यात नदी कोरडी पडली होती. यासाठी लघुपाटबंधारे विभागाने मलप्रभा नदीवरील यडोगा,वडेबैल, जळगा बंधारे करून यावर्षी उन्हाळ्यात पाण्याची सोय करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना माजी अध्यक्ष रमेश धबाले माजी ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा अंधारे, प्रभू कदम, ग्रामपंचायत सदस्य रुकमाना झुंजवाडकर आधी होते. सदर निवेदनावर चापगाव व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.