- खानापूर लाईव्ह न्युज/ (पुणे) प्रतिनिधी: महाराष्ट्रातील पुणे सारख्या शहरांमध्ये बेळगाव खानापूर अनेक उद्योजक जाऊन त्या ठिकाणी औद्योगिक व्यवसायात क्रांती करत या भागातील अनेक उद्योजकांच्या वर अवलंबून औद्योगिक क्षेत्रातील अनेक व्यवसाय दिवसागणिक वाढत चालले आहेत. अशाच उद्योगांना जर आपल्या जन्मभूमीत ही करता येईल का? यासाठी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी मदतीचा हात पुढे करतील का? असे अनेक प्रश्न समोर घेत खानापूर तालुक्यात औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासंदर्भात पुणे स्थित खानापूर (बेळगाव) मित्र मंडळाचे सचिव शिवाजी जळगेकर यांनी मागील काही दिवसांत आमदार विठ्ठलराव हलगेकर यांना भेटून तालुक्यात एखादी औद्योगिक विकास संदर्भात चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार आणि पुणेस्थित खानापूरकर उद्योजक यांच्यामध्ये आज शनिवारी पुणे या ठिकाणी प्राथमिक चर्चा पार पडली. आमदार आपल्या नियोजित पुणे दौऱ्यावर आले असता खानापूर (बेळगाव) मित्र मंडळांच्या माध्यमातून या चर्चेचे आयोजन करण्यात आले.
- प्रारंभी यावेळी खानापूर बेळगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष पीटर डिसोझा, बीपीएलचे नवनिर्वाचित अध्यक्ष दत्ता भेकणे, आनंदगड प्रतिष्ठाचे सर्व संचालक मंडळ, शांताराम बडसकर, आदीनी मा. आमदार श्री विठ्ठल हलगेकर, लैला शुगर्स चे एम् डी सदानंद पाटील व इतर आलेल्या मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सचिव शिवाजी जळगेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांमध्ये चर्चा घडवून आणली.
- पीटर डिसोझा यांनी आमदारांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या सरळ, साध्या आणि कार्यक्षम व्यक्तीमत्वाचे कौतुक केले. तसेच आपल्या तालुक्यासाठी सर्वजन मिळून ठोस उपक्रम राबविण्याची प्रबळ इच्छाही व्यक्त केली. पुणेस्थित उद्योजकांना सक्षम आणि कार्यक्षम बनविण्याबरोबरच आपल्या उद्योगाचा विस्तार खानापूर तालुक्यातही वाढवावा यासाठी मंडळातर्फे संचालक केशव जावळीकर यांच्या नेतृत्वाखाली उद्योजक मेळावा येत्या काही दिवसांत आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
- यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्यात औद्योगिक विकास होणे काळाची गरज असून सर्वांच्या सहकार्यातून या विषयाला प्राधान्याने तडीस नेण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करणार असून गेल्या अनेक दिवसांपासून जागेची चाचपणीही करत असल्याचेही सांगितले. इतरही काही आवश्यक बाबींची माहिती घेऊन या बाबतीत शासनाचेही सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदानंद पाटील यांनी पुढील भेटीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करू अशी ग्वाही दिली.
- याप्रसंगी मंडळाचे खजिनदार रामचंद्र बाळेकुंद्री, सह-खजिनदार परशराम निलजकर, संचालक बाळकृष्ण पाटील, देमाणी मष्णूचे; बीपीएलचे माजी अध्यक्ष केदार शिवणगेकर, संचालक प्रशांत गुंजीकर, नामदेव पाटील, नारायण पाटील; केपीएलचे अध्यक्ष रामू गुंडप, संचालक सचिन पाटील; आनंदगड प्रतिष्ठाचे संचालक सातेरी पाटील, किरण पाटील त्याचबरोबर उमेश निलजकर, राजाराम नांदोडकर, नितेश पाटील, श्रीधर गुरव, नागेश पाटील, उमाजी देवकर, नारायण पाटील, हरिश पाटील आदी पुणेस्थित खानापूरकर उपस्थित होते.