• LPG Cylinder : दिवाळीआधी गरिबांना मोदी सरकारचं ‘गिफ्ट’; अवघ्या 600 रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर मिळणार आहे. दसरा-दिवाळीपूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान 200 रूपयांवरुन 300 रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज झालेल्या बैठकीत घेतला.
  • रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. आज ही रक्कम 200 रुपयांवरुन 300 रुपये करण्यात आली आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग की, ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी कमी केले होते. ही किंमत 1100 रुपयांवरून 900 रूपयांपर्यंत कमी केली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला. पण, आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता फक्त 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. यावेळी अनुराग ठाकूर यांनी इतर निर्णयांचीही माहिती दिली.
Do Share
error: Content is protected !!
Call Us