खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : वन विभाग खानापूर, व लायन्स क्लब खानापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने 69 वा वन्यजीव सुरक्षा हा सप्ताह कार्यक्रम खानापूर तालुक्यात राबवण्यात येत आहे. सदर वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ दोन ऑक्टोंबर रोजी खानापूर येथे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या आठवड्यावर चालणाऱ्या वनजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम राबवले जाणार असून आज 3 रोजी रूमेवाडी क्रॉस ते हेमाडगा पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
- या वनजीव सप्ताह निमित्ताने खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यात तसेच तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातही विविध ठिकाणी वन खात्याच्या वतीने उपक्रम राबवले जाणार आहेत. या सप्ताहाच्या निमित्ताने खानापूर तालुका लायन्स क्लब च्या वतीनेही या अभियानात सहभाग दर्शवण्यात आला. लोकांच्या प्राण्यांचे संरक्षण तथा जंगलाचे संरक्षण याविषयी जागृती अभियान केले जाणार आहे या अभियानात जिल्हा वनाधिकारी शंकर कल्लोळकर, एसीएफ संतोष चव्हाण, खानापूरचे आर एफ ओ नागराज बाळेहोसुर, लोंढा आर एफ ओ नागराज भिमगोळ, हेमाडगा आर एफ ओ राकेश, तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष भाऊराव चव्हाण, लायन्स एम जी बेनकट्टी, अजित पाटील, जुनीद, महेश पाटील, डॉक्टर श्री प्रकाश बेतगावडा, सागर उप्पीन, तसेच वन खात्याचे कर्मचारी वर्ग, उपस्थित होते. खानापूरचे एसीएफ संतोष चव्हाण यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. व वन्यजीव सप्ताह बाबत माहिती दिली.