Screenshot_20231001_194046

  • सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी सहलीला गेले होते आणि जेवत असताना एक जंगली अस्वल आले

जंगलातील प्राणी शहरी रस्त्यावर दिसण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. विविध प्रकल्पांसाठी झाडे तोडण्यात आल्यामुळे जंगलातील प्राणी आता रस्त्यावर दिसून येत आहेत. सिंह, बिबट्या, साप आदी वन्यप्राणी अन्न-पाण्याच्या शोधात शहरांमध्ये भटकताना दिसून आले आहेत. आज सोशल मीडियावर मेक्सिकोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी मेक्सिको सिटीहून चिपिंके पार्कला पोहोचलेल्या कुटुंबाचा अस्वलाशी सामना होतो आणि आई ही परिस्थिती अगदीच शांततेनं सांभाळून घेते.

https://twitter.com/i/status/1706978657359827081

दक्षिण अमेरिका देशातील मेक्सिकोमध्ये ही घटना घडली. सहलीला फिरायला आलेलं कुटुंब एका ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थांबते आणि एका अरुंद टेबलावर काही खाण्यासाठी पदार्थ ठेवलेले असतात. अचानक तिथे एक लहान अस्वल टेबलावर चढते. टेबलावर काही पदार्थ मांडून ठेवलेले असतात. ते पाहून अस्वल ते खाण्यास सुरुवात करतो. अस्वल पदार्थ खाता खाता अलगद आई आणि चिमुकल्याकडे बघते आणि त्यांच्यावर हल्ला न करता पुन्हा अन्न खाण्यास सुरुवात करते. हे पाहून काही क्षणांसाठी तुम्हालाही भीती वाटेल. सहलीला गेलेल्या कुटुंबाचा अस्वलाशी कशा प्रकारे सामना होतो हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.

अस्वलाला पाहून आईने मुलाच्या डोळ्यांवर ठेवला हात :

जंगलातील मोठ्या प्राण्यांना बघून लहान मुलं घाबरून जातात आणि आरडाओरडा करताना दिसतात. आरडाओरडा केल्यास किंवा प्राण्यांना त्रास दिल्यास ते माणसांवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. हीच बाब लक्षात ठेवून व्हिडीओतील आईनं चिमुकल्याचा डोळ्यांवर तिचा हात ठेवला आहे; जेणेकरून तो अस्वलाला पाहून आरडाओरडा करणार नाही. तसेच यादरम्यान मुलगादेखील आईच्या कुशीत अलगद डोकं ठेवून शांत बसला आहे; जे पाहून खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Voyagefeelings या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या घटनेचं वर्णन युजरने कॅप्शनमध्ये केलं आहे आणि हा व्हिडीओ सहलीला उपस्थित असलेल्या कुटुंबातील एका सदस्यानं आपल्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे. तसेच व्हिडीओ बघता, अस्वलानं कोणालाही इजा पोहोचवली नाही; परंतु सहलीला गेलेल्या कुटुंबीयांसाठी हा भीतीदायक क्षण ठरला असेल एवढं नक्कीच.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us