केस मोकळे सोडून बसली आकाश पाळण्यात अन् होत्याचं नव्हतं झालं.
- राष्ट्रीय//द्वारका: गावात किंवा शहरात यात्रा असली की, लोकं प्रचंड गर्दी करतात. विविध प्रकारचे पाळणे हे यात्रेच प्रमुख आकर्षण असतं. पाळणे दिसले की, लहान मुलांसह मोठ्यांनाही पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही. तुम्हीही यात्रेत गेल्यानंतर एकदा तरी आकाश पाळण्यात बसलेच असाल, मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे विचार बदलू शकतात. काय आहे नेमका प्रकार ?
- यात्रेत लांबून पाहिलं तरी उंच आभाळात गोल फिरत असलेला आकाश पाळणा स्पष्ट दिसतो. हा पाळणा पाहून कोणालाही त्यात बसण्याची इच्छा होते. मात्र आकाश पाळण्यात बसणं एका तरुणीला महागात पडलं आहे.
- नुकताच द्वारकेतील एका यात्रा मेळ्यात झालेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहु शकता की, काही लोक आकाश पाळण्यात असलेल्या तरुणीचे केस कापताना दिसून येत आहेत. या तरुणीचे केस स्विंगमध्ये अडकले आहेत. काही लोक वर जाऊन सुरीने तिचे केस कापताना दिसून येत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरातचा असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेली मुलगी आकाश पाळण्यात केस मोकळे सोडून बसली असावी. आकाश पाळण्यात एका पाठोपाठ एक सर्वजण बसले.
जत्रेतील थरारक Video……