- खानापूर लाईव्ह न्युज/ कर्नाटक : गणपती बाप्पाचे स्वागत म्हणजे कधी कशाप्रकारे करेल हे सांगता येत नाही. श्री गणरायाचे अनेक भक्त आहेत ते मनोभावे गणरायाला भजतात. आज गणरायाचे स्वागतही देशभरात भक्तांनी मनोभावे केले अशाच पद्धतीने बंगळुरूच्या पुत्तेनहळ्ळी येथील सत्य साई गणपती मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नोटांची आकर्षक सजवण्यात आली आहे, जी खूपच जास्त सुंदर दिसते. दरवर्षी मंदिर विविध वस्तूंनी सजवलं जातं. यावेळी ही गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर जेपीनगरमधील सत्य साई गणपती मंदिर चलनी नोटांनी सजवण्यात आलं असून सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मंदिराच्या सजावटीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची नाणी वापरण्यात आली आहेत. यामध्ये हा रुपयापासून पाचशे रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या आहेत. या गणेश मंदिरात कडेकट बंदोबस्त ही ठेवण्यात आला असून सदर मंदिरात 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे व गनमॅन तैनात करण्यात आले आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 150 स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून मंदिराची सजावट केली. ते तयार करण्यासाठी तीन महिने लागले. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान सत्य साई गणपती मंदिराची विविध प्रकारे सजावट केली जाते. यावेळी हटके सजावट पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.