Screenshot_20230914_094458
  • श्रीनगर: काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकर नाग भागात दहशतवाद्यांनी झालेल्या चकमकीत लष्कराच्या कर्णलसह सुरक्षा दलाचे तीन अधिकारी हुतात्मा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
  • या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असले तरी या संघर्षात तिघांना हुतात्मा होण्याची वेळ आली आहे. दरम्यान राजोरीतील चकमकी हल्ल्यात लष्कराच्या एका श्वानालाही प्राण गमवावा लागला. या चकमकीत बलिदान प्राप्त झालेल्या लष्करी श्वानाचे नाव किट असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. चकमकी दरम्यान श्वानाने आपल्या हँडलला वाचवले. मात्र तो स्वतः हुतात्मा झाला पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत असताना ही घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराच्या 21 आर्मी डॉग युनिटमधील कॅट नावाच्या या सहा वर्षीय लेब्राडोर ने आपल्या हॅन्डरचे रक्षण करता करता आपल्या प्राणाची होती दिली.
  • अनंतनाग मधील या हल्ल्यात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धुनिक, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस उपाधीक्षक उमायून भट हे गोळीबारात जखमी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असे बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us