- खानापूर लाईव्ह न्युज/ पुणे: जीवनात ध्येय आणि चिकाटी ही अत्यंत महत्त्वाची आहे जन्मजात कोणी उच्च विद्यापीठ नसतो त्याला घडवण्यासाठी आई ही पहिली गुरु असते. लहानाचे मोठे होताना जसे संस्कार प्रत्येकावर घडतात त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्ती उभ्या आयुष्यात घडत असतो. उच्चविद्याभास घेण्यासाठी घराणेशाही लागत नाही, त्याला संस्कार लागतात, यासाठी कोणत्याही जाती-जमातीतील विद्यार्थी जिद्द व चिकाटी असेल तर तो नक्कीच उच्च विद्याभूषित घडू शकतो. दहावी ,बारावीच्या काळातच जीवनाचे ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी झपाटून कामाला लागा कोणत्याही क्षेत्रातील यशाला शॉर्टकट नसतो याची मनाशी गुण गाठ बांधून मिळेल तिथून सर्व प्रकारचे ज्ञान आत्मसात करा करिअरच्या असंख्य वाटा तुमची वाट पाहत राहतील असे आवाहन दत्ताजीराव करनूले यांनी व्यक्त केले. खानापूर बेळगाव पुणेस्थित श्रीकृष्ण गवळी हणबर समाजाच्या वतीने आयोजित स्नेह मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी अतिथी या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष रोहित पाटील होते.
- उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलानंतर गणेश वंदना नृत्य गौरी ज्ञानेश्वर गावडे यांनी सादर केले. पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष बालचंद्र चौगुले यांनी केले प्रास्ताविका ज्ञानेश्वर गावडे यांनी मांडली. ह्या स्नेहा मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी ,पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध खेळात मिळवलेल्या खेळाडूंचा विशेष गौरव व मानचिन्ह देऊन करण्यात आला.
- कर्नाटक बेळगाव महाराष्ट्र परिसरातून पुण्यात सध्या स्थित असलेल्या श्रीकृष्ण गवळी समाज अनेक भागात विस्तारला आहे या सर्व समाज बांधवांना एकत्रित करून पुणे स्थित श्रीकृष्ण गवळी समाजाची संघटना उभारण्यात आली आहे. या अंतर्गत दरवर्षी स्नेह मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो याच अनुषंगाने यावर्षीही शनिवारी येथील सर्व समाज बांधवांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेह मेळावा चंद्रभागा बँक्वेट पिंपळे गुरव पुणे येथे आयोजित केला होता .
- या प्रसंगी डॉ. श्रीकांत हेब्बाळकर डॉ. सौ पूजा हेब्बाळकर श्रीमती नंदा पाटील सौ स्नेहलता करनणुरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. समाजाबद्दल सर्व बांधवांनी एकत्र येऊन या समाज बांधणीला हातभार लावावा असे आव्हान केले. समाजाच्या सर्व बंधू भगिनींनी सह परिवार उपस्थित राहुन उस्फुर्त प्रतिसाद दिला. उपाध्यक्ष नारायण गावडे व राहुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले व भालचंद्र चौगुले यांनी आभार मानते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे अध्यक्ष बालचंद्र चौगुले, उपाध्यक्ष नारायण गावडे, खजिनदार नागेश पाटील, सचिव रोहित पाटील, संचालक ज्ञानेश्वर गावडे, रायगौंड चौगुले, राजू पुजारी, संतोष करडी, सुनील शिरगांवी, शरद करनुरे शंकर भीम भिमनवर , सौ शितल चौगुले, सौ गौरी चांदेकर, श्रीमती नंदा पाटील आदींनी परिश्रम घेतले