- खानापुर लाईव्ह न्यूज/प्रतिनिधि:
- मराठा मंडळ ही कर्नाटकातील नामवंत मराठी शिक्षण संस्था असून दिवसागणिक वाढता शैक्षणिक पसारा घेऊन कार्यरत असणारी संस्था आहे. बहुजन समाजाच्या हितासाठी विविध शैक्षणिक दालणं निर्माण करून चौफेर प्रगती साधणाऱ्या या शिक्षण मंडळाची सर्वसाधारण सभा नुकताच संपन्न झाली. गेली 18 वर्षे मराठा मंडळाची अभिमास्पद प्रगती साधणाऱ्या डाॅक्टर राजश्री नागराजू यांची मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी संस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक विनायक बसवंत घसारी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
- संस्थेच्या नुतन अध्यक्षा व उपाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी मराठा मंडळाचे सर्व संचालक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.