- खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी: जसे एखाद्या घराचे वैभव घरच्या तुळशी अथवा घर परिसरातील स्वच्छतेवर पारखले जाते त्याच पद्धतीने एखाद्या गावचे वैभव हे गावच्या विषयातील स्वच्छता, सौंदर्य यावर दिसते. अशाच पद्धतीचे गावचे सौंदर्य वाढवण्याचा उद्देश कीर हलशी येथील शिक्षक व ह भ प सदानंद पाटील त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य स्वाती पाटील यांनी स्वखर्चाने हाती घेतला आहे. हे अभिनंदन असून प्रत्येक गावात अशा सौंदर्य युक्त स्वागत कमानी उभारून गत वैभव वाढवावे असे विचार माजी आमदार अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. गावच्या विशेष एक सुंदर अशी स्वागत कमान उभारून गावचे वैभव वाढवण्याचा उद्देश सदानंद पाटील व त्यांच्या पत्नी स्वाती पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून समोर आला असून या स्वागत कमानीचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
- किरहलशी ता. खानापूर येथे हलगा ग्रामपंचायत सदस्य सौ स्वाती सदानंद पाटील व कुटुंबीयांच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या स्वागत कमानीचा कॉलम भरणी कार्यक्रम खानापूर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील, उपाध्यक्ष मंदा फठाण, ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील, प्रवीण गावडा, सुनील पाटील, पांडुरंग पाटील, नाझिया सनदी तसेच किरहलशी गावातील व्यंकट मेरवा, कृष्णाजी नारायण पाटील, दत्तात्रय पाटील, परशुराम पाटील, रुद्रप्पा सावंत, महादेव पाटील, निवृत्ती पाटील, जयवंत पाटील, परसराम पाटील, संजय नरसेवाडकर, परसराम नरसेवाडकर, गंगाराम सनदी बिटगार्ड प्रदीप विष्णू वीर, देवाप्पा जाधव गावातील महिला मंडळ यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला.