बेळगांव : क्रिडास्पर्धाच्या उद्घाटनाप्रसंगी बेळगांवउत्तरचे आमदार राजू शेट, जिल्हा शिक्षणाधिकारी एमबी नलतवाड, आर. पी.वंटगुडी, बसवराज मीलानट्टी, रमेश डिग्रज, जे. पी.पटेल आणि इतर
बेळगाव: शहर प्राथमिक आणि माध्यमिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन: विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
- बेळगांव, दि. 08 : प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्व आहे. जीवनाच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सुद्धा क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागातील खेळाडूच्या स्पर्धा वेळोवेळी आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे कारण बदलत्या काळात जीवनमान सुद्धा क्षणाक्षणाला बदलत आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सुख सुविधा वाढल्या सर्वत्र सोविस्कर होऊ लागले आणि नव्या युगात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळाचे आवड निर्माण करणे खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी विशिष्ट असे उपक्रम हाती घ्यावेत त्यांच्यामध्ये आत्मसन्मान नेतृत्व गुण आणि खिलाडू वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी नव्या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांच्या मनात बिंगवण्याचा प्रयत्न करायला हवा. शक्तिशाली विद्यार्थी क्रीडापटू निर्माण होतील याची शिक्षकांनी जबाबदारी घ्यावी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये देशाचे नाव उज्वल होण्याकरिता अथक परिश्रम प्रत्येकाने घेतले गेले पाहिजेत. असे विचार तालुकास्तरीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी जिल्हाशिक्षणाधिकारी एम.बी. नलतवाड यांनी केले.
- कर्नाटक सरकार बेळगाव जिल्हा पंचायत शिक्षण विभाग साक्षरता विभाग क्षेत्र गटशिक्षणाधिकारी कार्यालय शारीरिक शिक्षण शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळा जळगाव शहर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे नुकताच जळगाव जिल्हा क्रीडा संकुलन नेहरू स्टेडियम येथे KLE हॉस्पिटल जवळ असलेल्या भव्य क्रीडांगणावर या स्पर्धांचा प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी श्री एम बी नलतवाड उपस्थित होते.
- व्यासपीठावर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटक म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेट यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शाळा शिक्षण अक्षरदासोग विभागाचे अधिकारी बसवराज मिलानट्टी, प्रा. निलेश शिंदे, बेळगाव जिल्हा प्राथमिक शारीरिक शिक्षण संघाचे अध्यक्ष रमेश डीग्रज, समन्वय अधिकारी आय.डी. हिरेमठ, बेळगाव जिल्हा माध्यमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, बेळगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटना महिला अध्यकक्षा श्रीमती जी. पी पटेल, बेळगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष हणमंत मस्तीहोळी, तालुका प्रधान कार्यदर्शी बी.जी. हिरेमठ उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे ध्वजारोहण करून झाल्यानंतर क्रीडा ज्योत देऊन पतसंंचालनाला चालना दिली.
- स्वागत श्रीमती जे.पी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक आर पी वंटगुडी यांनी केले. परिचय उमेश कुलकर्णी व अशोक अन्नीगिरी त्यांनी करून दिला. बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी एम.बी. नलतवाड आणि उत्तरचे आमदार राजू शेठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषणे केली. यावेळी विवेक पाटील चंद्रकांत पाटील संजीव पवार , जयसिंग धनाजी, सुधीर माणकोजी, सी आर. पाटील, रामलिंग परीट आर के पाटील , एस. ए. कणेरी, आर के कुलकर्णी साधना भद्री, अनिल पाटील, प्रा. ए. एस. गोडसे, ए.बी. नारसन्नावर, एस. एस. पाटील, उदय पाटील, श्रिधर पाटील, संजू बडिगेर, अजित पाटील,
- श्री सिंदगी , उपाध्यक्ष श्रीकांत कोडकलकट्टी, सेक्रेटरी लक्ष्मीयेस कुरियर, एम. आर. अमाशी उपस्थित होते. सूत्रसंचालन एच.डी. मारीहाळ व एल. बी. नाईक यांनी केले. तर सचिन कुडची यांनी आभार मानले.