- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी!
- खानापूर तालुक्यात पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेऊन आयएएस, आयपीएस सारख्या परीक्षाना सामोरे जाऊन तालुक्यातील विद्यार्थी उच्च शिक्षित घडावेत यासाठी समुत्कर्ष संस्थेच्या वतीने खानापूर व बिडी या ठिकाणी प्राथमिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
- या नुसार सहावी,सातवी, आठवी, नववी च्या विद्यार्थ्यांसाठी आयएएस,आयपीएस, आयएफएस परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करून समुपदेश करण्यात आला होता व या अंतर्गत प्रशिक्षणार्थीना 100 मार्कांची लेखी परीक्षा घेण्यात आली.
- आज शनिवार दि. 9 सप्टेंबर रोजी दुपारी खानापूर येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला खानापूर तालुक्यातून तब्बल 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ‘मी ही आय ए एस’ होणार असा आशावाद विद्यार्थ्यांनी घालून दिला. या कामी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची ही मोठे सहकार्य लाभले. येथील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्वामी विवेकानंद स्कूलचे चेअरमन अधिवक्ते चेतन मनेरिकर, संचालक सुभाष देशपांडे, सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते वीरभद्र बुरुड या ज्या सहकार्यातून समुत्कर्श संस्थेच्या वतीने प्राथमिक उपक्रम हाती राबवण्यात आला. याला खानापूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत मोठे सहकार दर्शविले आहे त्यामुळे आता या स्पर्धापत्रिकेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आय ए एस, आय पी एस चे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम हाती राबवला जाणार आहे.