- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: रसायनशास्त्राला कधीकधी केंद्रीय विज्ञान असे सुद्धा म्हटले जाते. कारण, हे शास्त्र मूलभूत पातळीवर आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते.
- रसायनशास्त्राचा वापर इतिहासमध्ये फार पूर्वीपासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये करण्यात आल्याचा दिसून येतो. अनेक सहस्र ख्रिस्तपूर्व काळापासून विविध संस्कृती रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत होत्या, जे अखेरीस रसायनशास्त्राच्या विविध शाखांचा आधार बनले. अशा या रसायन शास्त्राचे महत्व आजच्या नव्या पिढीला पटवून देऊन वैज्ञानिक जगतात शिक्षकांनी मुलांना वेगवेगळे गमतीदार उदाहरणे देऊन काही कठीण अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने शिकवावेत व विद्यार्थ्यांमध्ये रसायनशास्त्र विषयाबद्दल आवड निर्माण करावी अशी उद्गार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले आज बेळगाव जिल्हास्तरीय रसायनशास्त्राच्या फोरम कार्यक्रम श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचालित शांतिनिकेतन पदवी पूर्व कॉलेजच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा रसायनशास्त्र फोरमचे चेअरमन प्रा. एस एस पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र राजेंद्र पाटील बेळगाव जिल्हा पदवी पूर्व महाविद्यालयाचे उपनिर्देशक प्रा. एम एम कांबळे उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महालक्ष्मी प्रतिमेचे पूजन झाले.
- पहिल्या सत्रात शेतकरी कॉलेजचे असोसिएट डॉ. प्रवीण घोरपडे यांनी मार्गदर्शन केले, यावेळी जगतात रसायनशास्त्राचे महत्व पटवून दिले. दुसऱ्या सत्रात गव्हर्नमेंट पदवी पूर्व महाविद्यालयाचे के.के.कोप येथील प्रा. एस आर जंगी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका व्हिक्टोरिया यांनी तर आभार सोनल शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 50 ते 60 प्राध्यापक शिक्षक वर्ग उपस्थित होते.