खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी!
तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप संचालक शांतिनिकेतन पब्लिक स्कूल व शांतिनिकेतन कॉलेजच्या वतीने महालक्ष्मी ग्रूप मॅरेथॉन स्पर्धा येत्या 16 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहेत. खानापूर तालुका मर्यादित या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.या सदर स्पर्धा शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या मैदानावर सकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दि. 10 सप्टेंबर पूर्वी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मध्ये आपली नावे नोंद करावीत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दि. 10 सप्टेंबर पूर्वी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मध्ये आपली नावे नोंद करावीत. सदर स्पर्धा मुला, मुलींसाठी 14 वयोगट, 18 वर्षाखालील व 18 वर्षाखालील तसेच ओपन अशा विविध गटात ठेवण्यात आले आहेत. तरी तालुक्यातील धावपटूंनी या मॅरेथॉन स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत खालील प्रमाणे बक्षीस दिली जाणार आहेत.