- ! खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- 2023 सालातील यावर्षीच्या 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक शिक्षकांना प्रदान करण्यात आले. यामध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित गोधळी सह्याद्री हायस्कूलचे मुख्याध्यापक तुकाराम लक्ष्मण सुतार यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक टी. एल. सुतार हे मूळचे हलगा येथील रहिवासी असून त्यांनी 1989 मध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली.
- दक्षिण महारास्ट्र शिक्षण मंडळ संचलित वनश्री हायस्कूल हलगा येथून त्यांनी आपली सेवा प्रारंभ केली. त्या ठिकाणी 14 वर्षे सेवा बजावल्यानंतर सह्याद्री हायस्कूल गोधोळी येथे 9 वर्षे ,त्यानंतर कन्या विद्यालय नंदगड येथे 2 वर्षे सेवा बजावली. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून चापगाव येथील मलप्रभा हायस्कूलमध्येही त्यांनी काही वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांची गेल्या 2 वर्षापासून पुन्हा सह्याद्री हायस्कूल गोधोळी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत.
- सेवेच्या काळात त्यांनी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित संबंधित शाळांमध्ये एक प्रामाणिक सहशिक्षकापासून मुख्याध्यापक पदापर्यंत त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल लक्षात घेता शिक्षण विभागाने त्यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सर्व शाळातील शिक्षक वर्ग आजी-माजी विद्यार्थी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे.