- खानापूर लाईव्ह न्युज /बेळगाव : इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे आपण अनेकदा म्हणतो. मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात उतरून दाखवली आहे ती बेळगाव तालुक्यातील दोन तरुणांनी. या उत्साही तरुणांनी तब्बल 2200 किलोमीटरचा प्रवास सायकलवर करत उत्तराखंडातील अवघड अशा देवभूमीतील केदारनाथ गाठले आहे.
- देवभूमीतील केदारनाथाचे दर्शन म्हणजे बारा ज्योतिर्लिंगातील एक मुख्य तब्बल 32 डोंगर पार करून देव भूमीतून जाताना असणारे उघड एकीकडे डोंगराची कपात दुसरीकडे खोलवर नदीची धार अशा खडतर वाटेतून जाताना हायसे वाटते जीवनात येऊन एकदा केदारनाथ पहावा असे म्हटले अशा अवघड वाटेत बेळगावच्या दोन युवकाने सायकल वरून तब्बल 18 दिवस प्रवास करून दर्शन घेतले व साकडे घातले. त्यांच्या या प्रवासाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
- बेळगाव तालुक्यातील दोघा तरुणांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले.
- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेत कार्य करणाऱ्या पवन पाटील (रा. मुलगा) आणि ऋतिक पाटील या दोघा तरुणांनी बेळगाव ते केदारनाथ सलग 18 दिवस सायकल प्रवास केला.
- अखंड भारत आणि श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचा संकल्पातून श्री किल्ले रायगडवर होणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनाचा संकल्प पूर्ण व्हावा तसेच बेळगावकरांना सुखसमृद्धी लाभू दे, असे साकडे त्यांनी महादेवाला घातले. काहींना जीवनात एकदा ही केदारनाथ होत नाही. तर यांनी सायकलवर केलेला प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांच्या या जिद्द आणि चिकाटीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.