khanapurlive .new
- खानापूर, हलशी, हलशीवाडीसह हातरवाड जंगलाच्या परिसरात वन्यप्रान्यानी शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू केले आहे. वन्य प्राण्यांकडून दररोज पिकांचे नुकसान होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकन्यांनी गुरुवारी मेरडा येथील वन खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. व आम्हाला भीक नको तुमचा कुत्रा आवरा अर्थात आम्हाला तुमची मदत नको तुमचे जंगलातील प्राणी आवरा अशी मागणी करत आंदोलन छेडले. वनखात्याने दाद न घेतल्याने कार्यालयाला ठोकून त्याना जणू शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. काही दिवसांपासून हलशीवाडी, गुडपी, हलशी, हतरवाड मस्केनहटी, बाळगुंद हलगा मेरडा आदी भागात वन्य प्राण्यांचा वाढला आहे. आहे. वन्य प्राणी, भात, ऊस शेंगा पिकात अतिक्रमण करून मोठे नुकसान करत आहेत त्यामुळे खानापूर तालुक्यातील मेरडा येथील वन खात्याच्या कार्यालयाला हलशीवाडीतील ग्रामस्थांनी टाळे ठोकूनच निषेध नोंदविला. या भागात हातरवाड जंगलात मोठ्या प्रमाणात हत्ती, गविरेडे, सह जंगली प्राण्यांचा मोठा वावर झाला आहे जंगलाच्या परिसरात हलशीपासून मेरडा मस्केन्हट्टी दरम्यान मोठी शेती आहे. या जंगलातील प्राणी दिवसाढवळ्या येऊन शेती पिकाचे मोठे नुकसान करत आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थिती त्यात भात पीक सावरताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहेत. अशातच जंगली प्राणी येऊन ते पीक फस्त करत असल्याने मोठे नुकसान होत आहे.
- शेती करण्यासाठी अवाडव्य खर्च उत्तम पिकल्यानंतर तो जनावरांच्या घशात घालावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान वन कथेचे अधिकारी शेतकऱ्यांना तुमच्या शेतीचे संरक्षण करा कुंपण घालून घ्या असे उद्धट उत्तर दिल्यामुळे कार्यालयाला टाळे ठोकून संतप्त शेतकऱ्यांनी वन खात्याला भीक नको कुत्रा आवर असा सल्ला दिला आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी चर्चा केली शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र या संदर्भात ठोस आश्वासन झाले नसून जंगलाच्या पायथ्याशी सौर कुंपण घालून शेती पिकाचे आमच्या रक्षण करा अशी सूचनाही अधिकाऱ्यांना येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
- या वेळी पीकेपीएसचे माजी अध्यक्ष सुधीर देसाई, अनंत देसाई, पुंडलिक देसाई, बबन देसाई, सुरेश देसाई वामन देसाई परसराम देसाई केशव देसाई राजू देसाई रोहन देसाई सुनील देसाई आधीचे उपस्थित होते