खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- खास गणेश चतुर्थी निमित्त तोपिनकट्टी ता. खानापूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व महालक्ष्मी ग्रुप यांच्या वतीने येथे शनिवार दि. 9 सप्टेंबर ते रविवार दि. 10 सप्टेंबर 2023 दरम्यान बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहेत. एका बैलगाड्याची चाके न बांधता बैलजोडीने बैलगाडा पळण्याची जंगी शर्यत आयोजीत करण्यात आली असून या शर्यतीचे उद्घाटन मलप्रभा शुगर फॅक्टरी चेअरमन मोहन संबर्गी यांच्या हस्ते होणार आहे.
- कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खानापूर चे आमदार व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर राहणार आहेत. कार्यक्रमात दीपप्रजलन माजी आमदार अरविंद पाटील, तालुका शर्यत कमिटीचे अध्यक्ष नारायण कार्वेकर, लैला सागर कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील, चांगापा निलजकर, ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा सुतार सह मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
- या शर्यतीत विजेत्या बैलजोड्यांना अनुक्रमे 25000,21000,15000,12000, 10000 अशी 18 बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. सदर शर्यत संन्रहोसुर तोपिनकट्टी रोड या ठिकाणी होणार आहे. तालुक्यातील बैलजोडी मालकांनी व शर्यत प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 87928381, 9741784323 शी संपर्क साधावा अशी आवाहन करण्यात आले आहे.