बोलताना एडव्होकेट सुधीर चव्हाण व्यासपीठावर सत्कारमूर्ती समवेत श्रीमान शिवाजीराव पाटील, प्राचार्य अरविंद पाटील, मुख्याध्यापक राहुल जाधव व इतर…
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
स्पर्धात्मक युगात आपणाला यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही उत्तम करिअर घडवायचे हेच वय आहे. अपयशाने खचून न जाता ध्येय समोर ठेवून सातत्याने अभ्यास करावा. विद्यार्थिनींनी सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. झोप कमी अभ्यास जास्त केला पाहिजे. जीवनात संपादनासाठी जिद्द आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची असून यासाठी सातत्य असणे आवश्यक असा मूलमंत्र आदिवक्ते सुधीर चव्हाण यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला.मराठा मंडळ ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालय खानापूर येथे भारतीय सेनेत भरती झालेल्या युवतींचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील होते. प्रमुख पाहुणे संचालक, शिवाजीराव एस पाटील, ताराराणी हायस्कूलची प्रभारी मुख्याध्यापक राहुल जाधव, प्राचार्य एन. ए पाटील, यडोगा गावचे पालक मल्लाप्पा एस अंधारे, तिओली गावचे राघवेंद्र नाळकर, मास्केनहट्टी गावचे गोपाळ गुंडूपकर उपस्थित होते.
त्याचबरोबर सत्कारमूर्ती सी आर पी एफ मध्ये निवड झालेल्या सख्या दोन बहिणी ताराराणी कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी कुमारी मयुरी मल्लाप्पा अंधारे कुमारी माधुरी मल्लाप्पा अंधारे तर बी एस एफ मध्ये निवड झालेल्या कुमारी योगिता ओमानी नाळकर तिओली, संयुक्ता गोपाळ गुंडुपकर मास्केनहदृटी यांचे कॉलेजच्या वतीने पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ हार घालून सत्कार करण्यात आला. तसेच बेळगाव बार असोसिएसनचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड झालेले एडवोकेट सुधीर चव्हाण यांचाही कॉलेजच्या वतीने शाल व श्रीफळ हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती कुमारी मयुरी मल्लाप्पा अंधारे हिने आपले मनोगत व्यक्त करताना अनुभव सांगितला. यश कसे मिळाले कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही. प्रयत्न केले पाहिजेत असे विचार व्यक्त केले. हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले
शेवटी प्राचार्य अरविंद पाटील आपल्या भाषणातून म्हणाले, आपल्याशी स्पर्धा केली पाहिजे ते सांगत अकबर बिरबल दरबारातील कोंबड्यांची झुंज हे उदाहरण देत विजय कोणाचा होतो. म्हणून आपल्यावर आपला विश्वास असला पाहिजे तरच आम्ही जीवनात यशस्वी होऊ शकतो अशी उदाहरणे देत विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन केले व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले प्राध्यापक एन एम सनदी यानी स्वागत व आभार व्यक्त केले.