- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- शेतकरी विरोधी काँग्रेस सरकारच्या विरोधात 11 रोजी खानापुरात आंदोलन; भाजप रयत मोर्चाची पत्रकार परिषद: कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्यानंतर शेतकरी विरोधी धोरण अवलंबले जात आहे शेतकऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या योजना बंद करण्याचे धोरण काँग्रेस सरकार करत आहे. शिवाय खानापूर तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना तालुक्याचा या यादीत समावेश यावा. शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्यासाठी येत्या 11 सप्टेंबर रोजी खानापूर येथील श्री बसवेश्वर चौक जांबोटी क्रॉस या ठिकाणी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढून निषेध नोंदवला जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार व कर्नाटका भाजपा रयत मोर्चाचे अध्यक्ष ईराणा कडाडी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका रयत मोर्चा अध्यक्ष तिरविर यांनी गुरुवारी खानापूर येथे बोलवलेल्या पत्रकार परिषदेत केली.
- या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल भाजप युवा नेते सदानंद पाटील राज्य महिला कार्यकारणी भाजप सदस्य धनश्री सरदेसाई तालुका प्रदान कारदर्शी गुंडू तोपिन कट्टी भाजप नेते सुभाष गुळ शेट्टी मीडिया प्रमुख राजेंद्र राय का प्रकाश निलकर मोहन पाटील बळीराम पाटील आदी उपस्थित होते.
- यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी मदत निधी 4 हजार रुपये विद्यार्थी वेतन 2 हजार रुपये अशा योजना सुरू करण्यात आल्या होत्या. पण सध्याच्या काँग्रेस सरकारने त्या बंद केले आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक विद्युत पुरवठा देण्याची योजना असतानाही त्यामध्ये कपात केली जात आहे. आधी मागण्या संदर्भात या आंदोलनात जोर धरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- यावेळी भाजपा अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांनीही काँग्रेस सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त केला. तसेच येत्या दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता होणाऱ्या या आंदोलनात खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाने व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी उपस्थित आणि केले. तसेच या मोर्चा विषयीच्या जागृती जागृती पत्रकाचे अनावरण करण्यात आले.