खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
- यावर्षी पावसाने दडी मारल्याने बेळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकाच्या दुष्काळ यादीत खानापूर बेळगाव भागाची नोंद नसल्याच्या तक्रारी आहेत. यासाठी पालकमंत्र्यांनी या भागाच्या पिकांची पाहणी करावी व खानापूर बेळगाव भागाचा दुष्काळ यादीत समावेश करावा त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात कर्नाटक राज्य सरकारने कृत्रिम पाऊस प्रयोग हाती घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोली यांच्याकडे गर्ल गुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यासह एका शिष्टमंडळाने केली आहे.
- यावेळी पालकमंत्री सतीश जारकी होळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे बेळगाव जिल्ह्यात मान्सून पावसाने यावर्षी पूरक पावसाळा केला नाही दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची मोठी घट झाल्याने भाग पिकाला मोठा फटका बसला आहे पिके वाळून जात आहेत. सध्या परिस्थितीत पन्नास टक्के पिकांची हानी झाली असून पाऊस झाला नाही तर शंभर टक्के दुष्काळ पडणार यात शंका नाही यासाठी राज्य शासनाने बेळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस प्रयोग हाती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदनाचा स्वीकार करून पालकमंत्र्यांनी खानापूर बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त लिस्ट मधे घेण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिले.. यावेळी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील,परशराम जाधव ,विवेक तडकोड, भरतेश तोरोजी ,महावीर पाटील इतर उपस्थित होते.