IMG_20230905_144207

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

  • Samutkarsh IAS कोचिंग संस्थेमार्फत दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी IAS परीक्षेची तोंडओळख व्हावी यासाठी खानापूर आणि बिडी येथे समुपदेशन (Orientation) कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील विद्यार्थी व पालक वर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचा पुढील भाग म्हणून सदर संस्थेतर्फे खानापूर तालुक्यातील 6 वी ते 9 वी इयत्तेत शिकत असलेल्या एकूण 80 विद्यार्थ्यांची IAS परीक्षा प्रशिक्षणार्थी म्हणून 100 मार्कांची लेखी प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारावर 8 आठवड्याच्या प्रशिक्षणासाठी (आठवड्यातून एकदा प्रशिक्षण) निवड केली जाणार आहे. प्रवेश परीक्षा दि. शनिवार दि. 9 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2:30 ते 4:30 या कालावधीत स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळा, मठ गल्ली, खानापूर येथे आयोजीत करण्यात आली आहे. उत्सुक विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव, शाळा,पत्ता SMS द्वारे मोबाईल क्रमांक 8217298335 वर दि. 6 सप्टेंबर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाठवावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
  • परीक्षेसाठी रू.100/-प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा 100 मार्कांची असेल. 25 मार्क बहु पर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions), 50 मार्क मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश या पैकी कोणत्याही एका भाषेत मोठा निबंध (Major Essey) लिहिण्यासाठी, 25 मार्क लहान निबंध (Minor Essey) लिहिण्यासाठी असतील. मोठा निबंध व छोटा निबंध एकाच भाषेत लिहिता येणार नाही. दोन्ही निबंध कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी या पैकी कोणत्याही दोन वेगळ्या भाषेत लिहावे लागतील. तरी खानापूर तालुक्यातील इयत्ता 6 वी ते 9 वी या इयत्तेतील उत्सुक विद्यार्थी वर्गाने या संधीचा लाभ घ्यावा. पालक वर्ग व सर्व शाळांच्या मुख्याध्यापक वर्गाने उत्सुक विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी पाठवावे असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us