खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
- खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी ही सर्व समावेशक पार्टी समजली जाते. पण अंतर्गत मतभेद काही कमीही नाहीत. खानापूर तालुक्यात तब्बल 92 हजार मतांनी भारतीय जनता पार्टीने आमदार निवडून आणण्यात सर्वजण झटले. पण तदनंतरच्या काळात कुठेतरी नाराजीची चर्चा असताना आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी एका छताझाली आले. ” ये बंधन तुटेगा नही… अशी जणू शपथच बऱ्याच दिवसानंतर पक्ष कार्यालयात झाली. आज दोन प्रमुख मुद्द्यावरून बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन करण्यात आला. यावेळी अनेक महिला भगिनींनी उपस्थित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हातावर रक्षाबंधन करून बंधू प्रेमाची आठवण करून दिली.
- याच बंधू प्रेमाबरोबर तालुक्यातील नेते मंडळींनी ही एकमेकाला राखी बांधून “ये बंधन टूटेगा नही..! अशा प्रकारचा संदेश दिला. आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांनी एकमेकाला राखी बांधून आम्ही सगळे एक आहोत असा संदेश दिल्याचे चित्र दिसून आले. खरंतर, भाजप पार्टीत अनेक नेतेमंडळी मातब्बर आहेत. निवडणुकीत उमेदवारीवरून रसिकेश् झाली. पण एकसंघ होऊन खानापूर तालुक्यात पार्टीचा आमदार करण्यात सर्व कार्यकर्त्यांनी कार्य केले. माजी आमदार अरविंद पाटील यांनी प्रखडपणे प्रचार यंत्रणेत उभे राहून साथ दिली. पण मधल्या काळात रथाची दोन चाके विस्कळीत झाली आहेत का? असा सवाल कार्यकर्त्यात निर्माण झाला. परिणामी विरोधकांनी याचा लाभ उठवत आजी-माजी आमदारांना पेचात आणण्याचा प्रयत्न केला. पण हीच ताकद भाजपच्या नेत्यांनी एकीतून राखली असती तर, त्यांची एवढी मजल झाली नसती. पण त्याचा फायदा विरोधकानी घेत असल्याचे चित्र दिसून आले. पण आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आजी, माजी आमदारानी एकत्रित येऊन ”ये बंधन टूटेगा नही.!.. असा संदेश दिला. खरा, पण हे एकीचे बंधन असेच राखून आगामी पाच वर्षात कार्य केल्यास कोणीही पक्षाकडे बोट करू शकणार नाही असे उपस्थित कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले.
- .खरंतर खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीत अनेक नेतेमंडळी मातब्बर आहेत. निवडणुकीत उमेदवारीवरून रसिकेस झाली. एकसंघ होऊन खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा आमदार करण्यात सर्व कार्यकर्त्यांनी कार्य केले. माजी आमदार अरविंद पाटील यांनी प्रखडपणे प्रचार यंत्रणेत उभे राहून साथ दिली. पण मधल्या काळात रथाची दोन चाके विस्कळतील झाली आहेत का? असा सवाल कार्यकर्त्यात निर्माण झाला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यात सुखद चर्चा अन् विरोधकांनाही याची नक्कीच चपराक बसली. शिवाय असेच बंधन कायमचे राहिल्यास तालुक्यातील कोणतीच शक्ती भाजपकडे डोळे वटारून पाहणार नाही असा संदेशही यावेळी उपस्थित भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला
- युवा नेते पंडित ओगले यांना समर्थन: पत्रकार परिषद
- या रक्षाबंधनानंतर खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने एका पत्रकार परिषदेद्वारे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते पंडित ओगले यांच्या विरोधात नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणावरून पोलिसात केलेली तक्रार ही चुकीची असून यामागे ही राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला वास्तविक नगरपंचायतीसमोर पंडित ओगले सह आमदार विठ्ठल हलगेकर संजय कुबल सह अनेक नेतेमंडळी व खानापूर शहरातील अनेक समाजसेवक सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी राजू वठारे यांच्या वर्तवणुकीचा निषेध करून त्यांना या नगरपंचायतीतून तडकाफडकी बदली करण्यात यावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठवून येतील कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. पण या विरोधाचा फायदा घेत काही राजकीय पक्षाच्या लोकांनीच मुख्याधिकारी वठारे यांना भडकावून पंडित ओगले यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे पंडित ओगले यांच्यावरील मुख्याधिकाऱ्यांनी केलेली केस तातडीने मागे घेण्यात यावी अन्यथा रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडून निषेध नोंदवला जाईल शिवाय या मुख्याधिकाऱ्यांची तातडीने बदली करण्यासाठी क्रम हाती घेण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली व जोपर्यंत पंडित ओगले यांना या गुन्ह्यातून मोकळीक मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही गप्प बसणार नाहीत. प्रसंगी आंदोलनात इशारा यावेळी या पत्रकार परिषदेद्वारे देण्यात आला. यावेळी आमदार विठ्ठल आळगेकर माजी आमदार अरविंद पाटील तालुका भाजपा संजय कुबल, प्रमोद कोचेरी, राजेंद्र रायका, गुंडू तोपिनकट्टी यासह भाजपचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.