खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी!

खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वठारे यांनी केलेल्या मनमानी कारभाराला कंटाळून नगरपंचायतीच्या कर्मचारी युनियनने कालपासून आंदोलन छेडले. आज शुक्रवारी सकाळपासून नगरपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन सुरू ठेवले. दरम्यान खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर तसेच खानापुरातील सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नगरपंचायतच्या नगरसेवकांनी या कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देत तातडीने या मुख्याधिकारी राजू वठारे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केली.

नगरपंचायतीचे प्रभारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी मुख्याधिकारी राजू वठारे यांच्याकडचा पदभार तातडीने कमी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून द्यावे व येथून बदली करण्यात यावी अशी सूचना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तहसीलदाराना केली. तहसीलदारांनी उपस्थित आक्रमक भूमिकेची दखल लक्षात घेता कामगारांचा पगार तातडीने काढून देणे, मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी कमी करून दुसऱ्याकडे चार्ज देणे, चे कबूल करून आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना नगरपंचायतीचे ठोकलेले टाळ खोलून पुनश्च कामकाज सुरू करण्यासाठी विनंती केली. व आंदोलन मागे घेण्यात आले.

खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वठारे हे खानापूर नगरपंचायत वर आल्यापासून त्यांचा मनमानी कारभार, कर्मचाऱ्यांना भेटीस धरणे पगार वेळीच न करणे, घरची कामे करण्यास सांगणे अशा अनेक तक्रारी या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात होत्या. गुरुवारी युनियनचे अध्यक्ष शहानुर गुडलार यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी मागणी केली असता गुडलार यांच्यावरच आरेरावी करून त्यांना खुर्ची घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात युनियन संघटना एकत्रित झाली व नगरसेवकांना पाचारण करून आंदोलनाला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळी नगरपंचायतीला टाळे ठोकून स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. सदर बाब आमदार विठ्ठल हलगेकर यांना कळताच त्यांनीही त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी भाजपा अध्यक्ष संजय कुबल युवा नेते पंडित ओगले नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच खानापूर येथील काही समाजसेवक कार्यकर्ते या ठिकाणी गर्दीने जमा झाले. नगरपंचायतीसमोर एकच गर्दी झाल्याने पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनीही या ठिकाणी उपस्थित राहून नियंत्रण आणले. दरम्यान नगरपंचायतीचे प्रभारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांचे समाधान केले. व मुख्याधिकारी राजू वठारे यांच्यावर कारवाई आश्वासन दिले. आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही याबाबत क** भूमिका घेऊन तात्काळ मुख्याधिकारी वठारे यांची बदली करण्यात यावी. त्यांचा पदभार कमी करण्यात यावा व दुसऱ्याकडे चार्ज देऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी शब्द सूचना केली. व त्यानंतर तहसीलदारांनी सगळ्या मागण्या मान्य करून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. व ठोकलेले टाळे काढून नगरपंचायत चा कारभार पूर्व पदावर आणून कामकाजाला सुरुवात करण्यासाठी सूचना केली. यावेळी सर्व नगरसेवक, खानापूर येथील भाजपचे पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us