IMG_20230822_195731

खानापूर लाईव्ह न्युज / प्रतिनिधी :

खानापूर तालुक्यात अंजुमन इस्लाम मायनॉरिटी सोशल वेल्फेअर फाउंडेशन नूतन अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते इरफान अहमद तालीकोटी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

खानापूर तालुक्यात अंजुमन इस्लाम मायनॉरिटी वेल्फेअर फाउंडेशन ची स्थापना दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. सदर फाउंडेशन खानापूर तालुक्यातील सर्वस्तरातील मुस्लिम प्रमुखांना एकत्रित करून समाजाच्या संघटना व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. प्रारंभी या संघटनेचे अध्यक्षपदी जेडीएस नेते नासिर बागवान यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी माघार घेऊन नूतन पदाधिकाऱ्यांची सूचना केली. त्यानुसार मंगळवारी तालुक्यातील फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक खानापूर असोगा रोडवरील टेकडी फार्म हाऊसवर झाली. व या ठिकाणी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. व यामध्ये सर्वांमध्ये सामाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी मन्सूर अहमद तहसीलदार, सेक्रेटरी पदी वकील मजहर टेकडी तर खजिनदार पदी मुगुटसाब समशेर (बिडी) यांची निवड करण्यात आली आहे. उभयतांचे कमिटीच्या पदाधिकारी व सभासदांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना इरफान तलिकोटी यांनी तालुक्यातील समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून जबाबदारी दिली आहे ती पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करीन शिवाय तळागाळातील युवा कार्यकर्त्यांसह प्रमुखांना विश्वासात घेऊन संघटनात्मक काम करण्यासाठी नेहमी कार्य तत्पर राहू यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे विचार त्यांनी मांडले यावेळी इतर पदाधिकाऱ्यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us