खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी;
सध्या माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे पेव सुरू झाले आहे. प्रत्येक विभागांतर्गत क्रीडा स्पर्धांना प्राधान्य देत आहे. विभागीय क्रीडा स्पर्धातून जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना पातळीवरील क्रीडा स्पर्धा भाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. विद्यार्थ्यांनीही या विभागातील क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकाधिक क्रमांक पटकावून तालुका, जिल्हा पातळीपर्यंत उल्लेखनीय काम करावे, क्रीडा स्पर्धा या शालेय जीवनात आनंद देणाऱ्या व उत्साहात देणाऱ्या ठरतात. व विद्यार्थ्यांच्या मनोबल व आत्मविश्वास वाढवण्याचे काम करतात असे विचार माजी उप सभापती व राज्य वन निगमचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी व्यक्त केले. नुकताच निटुर येथे 20 शाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन समारंभ येथील प्राथमिक शाळेच्या आवारात पार पडल्या. यावेळी ते उद्घाटक या नात्याने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ गणेबेलकर होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात क्रीडा ज्योतीचे पूजन, खेळाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पी के पी एस निटूरचे संचालक नामदेव कल्लाप्पा सुळेभावीकर, लक्ष्मण बाळाप्पा नाईक, नागेश यशवंत मादार, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष नानू गोपाळ नार्वेकर, कॉन्ट्रॅक्टर नवनाथ मोहन पाटील, शाळेच्या मुख्याधिपका राजश्री पेडणेकर, शिक्षिका माधुरी कालकुंद्रीकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नतनिन पटेल यांनी केले यावेळी एसडीएमसी कमिटी व नीटूर ग्रामस्थ उपस्थित होते. सदर क्रीडा स्पर्धा दोन दिवस चालणार आहेत.