खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी ;
माध्यमिक शाळा अंतर्गत नंदगड विभागीय वार्षिक क्रीडा स्पर्धा गेल्या दोन दिवसापासून नंदगड येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या रांगणात भरवल्या जात आहेत. 2023-24 सालाकरिता घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या मलप्रभा हायस्कुल चापगावने खो-खो, कब्बड्डी, ह्यांडबॉल प्रथम क्रमांक पाठकवून मिळविले 2023-24 चे चॅम्पिनशिप पटकावले आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
या स्पर्धांमध्ये मुलांचा खो-खोमध्ये प्रथम मुलींचा कोको प्रथम मुलींची कबड्डी प्रथम व मुलाचा हँडबॉल प्रथम विजेतेपद पटकावले आहे.
याशिवाय वैयक्तिक खेळामध्ये 400 मीटर तसेच शंभर मीटर धावणे मध्ये कु. गणेश रमेश हंगिरकर प्रथम आला आहे तर भालाफेक मध्ये कुमार गंगाराम पाटील प्रथम 200 मीटर धावण्यामध्ये उद्धव महेश भेकणे द्वितीय आले आहेत
त्याचप्रमाणे कु.पद्मावती पाटील – फास्ट ऑक द्वितीय , कु. मयुरी पाटील – 100 मिटर द्वितीय, कु. रोशनी रामा जीवाई – बुद्धिबळ प्रथम. कु. श्रिजीत मारुती पाटील – कुस्ती प्रथम अशी अनेक वयक्तिक बक्षिसे मिळविली आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक शिक्षक रुंद शिक्षकेतर कर्मचारी शाळा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक वर्ग यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.