IMG-20230818-WA0026

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : आईची माया वडिलांची छाया ही एखाद्या कुटुंबाला नेहमी साथ देणारे ठरते पण छायेतील आणि मायेतील आशीर्वाद रुपी हात हरवला तर अख्खा परिवार दुःख सागरात जातो.
वडील म्हणजे जीवनाचा आधार स्थंभ असतात, प्रत्येकाच्या जीवनात वडील हे नेहमी सुपर हिरोची भुमिका निभावत असतात. प्रेम आणि आदर जिथे भितीयुक्त आदराने झुकतो त्याचं नाव बाप असते. वडील नेहमीच कठोर असतात पण त्यांचा जवळ एक हळवं मन ही असते. दर्यादील ऱ्हदय असणारे व जन सेवेतून माणुसकीचा पुल बांधणारे खानापूर तालुक्यातील मेरडा गावचे समाज सेवक आणि जन सेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, प्रथमेश कंस्ट्रक्शन आणि डेव्हलपर कोल्हापूर सर्वेसर्वा *श्री के. के पाटील* यांचे वडील ह. भ.प. कै श्री कृष्णाजी भरमाण्णा पाटील वय वर्षे 75 यांचे मुलगा श्रीयुत के के पाटील यांच्याकडे विश्रांतीसाठी गेले असताना दी.09 रोजी कोल्हापूर येथे दुखःद निधन झाले.ही दुखःद बातमी ऐकून खानापूर तालुकाभर पसरलेल्या के कें. चा मित्र परिवार दुखसागरात बुडाला आहे.

कै. श्री कृष्णाजी पाटील हे मितभाषी होते. सतत हरी नामात रमणारा हरी भक्त व प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांनी अपरिमित कष्ट झेलून आपल्या दोन कर्त्या चिरंजीवासह कोल्हापूर जवळील हरळी गावात स्थित असणारी कन्या सौ. सविता यांना उत्तम संस्काराची शिदोरी देऊन सुंदर जीवन जगण्यास प्रवृत्त केले. मोठे चिरंजीव व हलगा ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री पांडुरंग के. पाटील यांना राजकारणातून समाज सेवा घडविण्याचा कानमंत्र देणारा महागुरू आज हरवला आहे.
मातृमांगल्य श्रीमती रुक्मिणी हीचा कुंकू, जीवलग सोबती, पती आज हरवल्याने ती आज हवालदिल झाली आहे.
ह भ प कृष्णाजी पाटील हे एक वारकरी संप्रदायातील उत्तुंग अभ्यासू व समाज प्रबोधनात्मक काम करणारे वारकरी होते गावातच नैवेद्य परिसरातील अनेक वारकऱ्यांची सांगड बांधून त्यांनी आपले जीवन यशस्वी केले केवळ मुलांच्या वरच संस्कार नव्हे तर गावावरही संस्कार करण्यात येईल त्यांचे हे आकस्मिक जाणे मनाला न पटणारे ठरले पण नीतीचा खेळच वेगळा होता आणि ते हसत्या खेळत्या व प्रगतीच्या वाटेवर चालणाऱ्या कुटुंबातून नाहीसे झाले. त्यांच्या उतार वयात सुखाचे घास खाण्याची त्यांना अवलिक संधी मिळाली नाही. याचेच दुःख त्यांच्या परिवाराला वाटते. पण नियतिचा खेळ कोण जाणे, अशा या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तो सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना देवत व त्यांच्या जाण्याला आज शनिवार दिनांक 19 रोजी अकरा दिवस होत आहेत. या दिनी त्यांच्या
मृत्म्यास ईश्वर चरणी चिरशांती लाभावी हीच मनःपूर्वक प्रार्थना
ओम शांती
💐💐🙏😞🙏💐💐

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us