खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायत च्या वतीने 77 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या ध्वजारोहन प्रसंगी हलगा येथील शहीद जवान संतोष गुरव यांच्या वडिलांचा सन्मान करण्यात आला. व शहीद जवान संतोष गुरव याला अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच भारतीय सैनिक शहीद जवान वसंत नागाप्पा गावडा, हनुमंत परशराम गावडा, भरत नारायण गावडा -पाटील( तिघेही रा. हत्तरवाड) सदर जवान यापूर्वी शहीद झाले आहेत त्यांची आठवण करून त्यांच्याही पालकांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे आजादी का अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने येतील स्मशानभूमीत 75 झाडे लावून उपक्रम राबविण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष मंदा पठाण,सदस्य प्रवीण गावडा, रणजीत पाटील, सुनील पाटील, सावित्री मादार, नाझिया सनदी, इंदिरा मेदार उपस्थित होते. उपस्थित आमचे स्वागत ग्रामपंचायत विकास अधिकारी परशुराम यांनी केले यावेळी गावातील नागरिक, पंचायत कर्मचारी उपस्थित होते.