IMG_20230815_092912


खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

चापगाव ग्रामपंचायत तसेच मलप्रभा हायस्कूल चापगाव तथा कन्नड व मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने 77 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने चापगाव ग्रामपंचायत तसेच मलप्रभा हायस्कूलच्या वतीने गावातील आजी-माजी जवानांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी ग्रामपंचायतच्या आवारात ग्रामपंचायती अध्यक्ष गंगवा कुरबर, उपाध्यक्ष मालूबाई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर मलप्रभा हायस्कूलच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर कन्नड व मराठी प्राथमिक शाळेच्या आवारात शाळा कमिटीचे अध्यक्ष मष्णू चोपडे , विजय मादार यांच्या हस्ते करण्यात आले.


प्रारंभी हायस्कूल व प्राथमिक शाळांच्या वतीने गावात प्रभात फेरी काढण्यात आली. ग्राम पंचायतीच्या आवारात ध्वजारोहण अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या हस्ते झाले. तर फोटो प्रतिमेचे पूजन माजी अध्यक्ष स्नेहल पाटील, उपाध्यक्ष मारुती चोपडे, सदस्य नागराज यल्लुरकर, सूर्याजी पाटील, नजीर सनदी , देंमवा मादार, लक्ष्मी मादार यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत विकास अधिकारी आरती आंगडी यांनी प्रतिज्ञापत्र घोषित केले.


जवानांचा केला सन्मान

येथील द.म. शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण शाळा कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष रमेश धबाले होते.

प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक पी.बी. पाटील यांनी उपस्थित यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला निवृत्त जवान परशराम चोपडे , निवृत्त जवान संजय बेळगावकर, जवान सातेरी जिवाई, ज्ञानेश्वर पाटील (आलेहोळ) यांचा श्रीफळ शाल देऊन ग्रामपंचायत तसेच मलप्रभा हायस्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर यावेळी शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमात सूत्रसंचालन सहशिक्षक तुकाराम सनदी यांनी तर आभार सहशिक्षक जी पी पाटील यांनी केले. यावेळी पालक वर्ग शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मनःपूर्वक हायस्कूलच्या शाळा वर्ग खोलीत फरशी बसवण्यासाठी निवृत्त जवान परशराम चोपडे, जवान संजय बेळगावकर, जवान सातेरी जीवाई, त्यांनी प्रत्येकी एक ब्रास फरशी तसेच जवान शाहू पाटील यांनी 5001 तर जवान ज्ञानेश्वर पाटील यांनी 1001 रुपयाची देणगी दिली. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी यडोगा येथील माजी विद्यार्थी विठ्ठल सनदी देवेंद्र हंगिरकर अमोल हंगिरकर शेखर देवलतकर यांनी विद्यार्थ्यांना जवळपास 15 हजार रुपये खर्च करून शालेय खेळाडू विद्यार्थ्यांसाठी टी-शर्ट दिले आहेत. शिवाय अनेक उपस्थित पालक वर्गाने ही प्रत्येकी 501 प्रमाणे देण्यात दिल्या आहेत. या सर्वांचे शाळा व्यवस्थापन कमिटी व शिक्षक वर्गांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us