खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :
आजच्या जीवनात अनेकांच्याकडे घडगंज पैसा आहे,पण समाधान नाही. पण समृद्ध जीवन जगण्यासाठी पैशापेक्षा आरोग्य संपदा ही फार महत्त्वाची आहे. यासाठी प्रत्येकाने आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शालेय जीवनापासून उभ्या आयुष्यात मिळणारे खेळाचे धडे आणि अभ्यासाचे गुणात्मक शिक्षण हे उज्वल भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. यासाठी उत्तम शिक्षणाबरोबर आरोग्य संपदेसाठी लागणारे उत्तम व्यायाम, उत्तम योगासन आणि उत्तम खेळ हीच खरी जीवनाची संपत्ती असल्याचे विचार तिवोली येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर हेबाळकर यांनी बोलताना व्यक्त केले. मंगळवारी माडीगुंजी येथील माध्यमिक विद्यालयात विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते. कार्यक्रमात या स्पर्धांचे उद्घाटन किशोर हेबाळकर ग्रामपंचायत अध्यक्ष संतोष गुरव आदींच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मारुती जाधव होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी अध्यक्ष ग्रामपंचायत सुभाष घाडी, विद्यमान ग्रामपंचायत उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, हनमंत जोशीलकर, ग्रामपंचायत सदस्य कुतुबुद्दीन बिच्चानावर पी के पी एस गुंजी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य विभागीय शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शारीरिक शिक्षक मान्यवर उपस्तिथ होते .यावेळी माडीगुंजी विभागातील आठ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या जोशात सहभाग नोंदवला होता तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक वर्ग ही मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभागी झाले होते.