खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
शालेय जीवनातील क्रीडा स्पर्धा आनंददायी व आरोग्य संपन्नतेसाठी असतात शालेय जीवनातील कला कौशल्य हे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्याचे काम करते यासाठी विद्यार्थ्यांनी अशा खेळांमध्ये भाग घेऊन पुढील भविष्यात शिक्षणाबरोबर आरोग्य संपन्न जीवनासाठी व विविध खेळातून प्राविण्य मिळवण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम या शालांतर्गत क्रीडा स्पर्धातून घडते. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन लैला साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक व भाजपचे युवा नेते सदानंद पाटील यांनी व्यक्त केले. गर्लगुंजी विभागीय माध्यमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धा गणेबैल येथे पार पडल्या. याप्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अनुपस्थित भाजपा युवा नेते सदानंद पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चांगले शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. एन. मजुकर होते.
बोलताना वाय. एन मजुकर यांनी या विभागात येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणात आपले प्राविण्य दाखवून या विभागातून तालुक्यात उच्चांक साधण्यासाठी प्रयत्न करावे अभ्यासाबरोबर आरोग्य संपदा ही महत्त्वाची बाब असून विद्यार्थ्यांनी अशा खेळांमध्ये सहभाग दर्शवून आनंदमय शिक्षण घ्यावे असे आवाहन केले. यावेळी मंडळाचे सचिव प्रसाद वाय. मजूकर, माजी उपसभापती सुरेश ना. देसाई, मंजुनाथ टी. आळवणी आधी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी भाजप युवा नेते सदानंद पाटील यांनी येथील प्राथमिक शाळेला ही भेट यावेळी शाळेच्या मूलभूत समस्या आमदारांच्या निदर्शनाला आणून त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.