खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा म्हटले की, ग्रामस्थात उधान आलेच. खानापूर तालुक्याच्या अनेक गावात परंपरागत चालत आलेल्या श्री महालक्ष्मी देवी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा आहे. यानुसार खानापूर तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या कापोली के. जी. कर्यादीसी संबंधित असलेल्या मलवाड येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा यात्रा उत्सव 2024 च्या एप्रिल महिन्यात भरवण्याचा निर्णय येथील पंच कमिटीने घेतला आहे. श्री महालक्ष्मी देवीच्या कर्यादित 24 गावांचा समावेश आहे. या 24 गावांशी संबंधित या देवीचा उत्सव तब्बल 22 वर्षांनी साजरा करण्याची प्राथमिक बैठक कापोली येथील श्री माऊली मंदिरात नुकतीच पार पडली.
यानुसार या देवीचा उत्सव साजरा करण्यासाठी संबंधित गावांना प्राचारण करून एक व्यापक बैठक बोलावून या यात्रोत्सवाचे नियोजन करण्यासाठी येत्या 14 ऑगस्ट रोजी महत्त्वाची बैठक बोलावून रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. मलवाड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या कर्यादीत संबंधित 24 गावे येतात. यामध्ये मलवाड सह कापोली, डिगेगाळी, हालसाल, पडलवाडी, अनगडी, करंजाळ, शिंपेवाडी, जटगा, कामतगा, भाटेवाडी, भालके, घोषे, पोटोळी, रंजनकोडी, कुलमवाडा, जोमतळे,वाटरे, मोहिशेत, वरकड, पाठ्ये, दुधवाळ या गावांचा समावेश होतो. श्री महालक्ष्मी देवीची यात्रा यापूर्वी 22 वर्षांपूर्वी भरली होती. या संदर्भात नुकतीच येतील कापोली येथील माऊली मंदिरात पंच कमिटीचे प्रमुख इनामदार रवींद्र देसाई, शिवाजी देसाई, शरद देसाई, सदा गुंजीकर, रामचंद्र देसाई, विठ्ठल जाधव, अण्णाप्पा वीर तसेच कापोली, मडवाळ येथील पंच कमिटी शिवाय हकदार मंडळी यावेळी उपस्थित होती. आता येत्या 14 तारखेला बैठक बोलवण्यासाठी 24 गावातील प्रमुख हकदार यांना पाचारण करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तरी वरील गावातील प्रमुख पंच कमिटी हाकदार यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही पण कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.