खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यातून 60 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. पण त्या बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक भरती नसल्यामुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शाळा एकेरी आहेत. तर अनेक शाळात भाषिक शिक्षकच नसल्याकारणाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकतेवर नुकसान होत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी सरकारी शाळा सोडून खाजगी शाळांना प्राधान्य देत आहेत. यासाठी खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची भरती त्वरित करण्यात यावी. अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी व त्यानंतरच कौन्सिलिंग द्वारे बदली झालेल्या शिक्षकांना मोकळीक देण्यात यावी अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यात अंगणवाडी व सहायिका भरती प्रक्रिया ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्येही तृतीय भाषा कन्नड असलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत अन्याय होणार आहे. यासाठी या भरती प्रक्रियेत तृतीय भाषा कन्नड असलेल्या मराठीसह इतर भाषिक उमेदवारांच्या वर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी यापूर्वी ज्याप्रमाणे अंगणवाडी शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर भाषेची अट न लावता नियुक्ती करावी अशी ही मागणी यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील पालकमंत्री सतीश जाकी होळी, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी खानापूर तालुक्यातील विविध समस्या संदर्भात चर्चा केली शाळेची समस्या अंगणवाडी समस्या तसेच महामार्गात जमिनी गेलेल्या भूसंपादित शेतकऱ्यांना वेळीच न्याय मिळवून द्यावा अशा अनेक मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर व्यक्त केल्या.
सदर निवेदन देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, चिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण धनंजय पाटील, रणजीत पाटील, कृष्णा कुंभार, पांडुरंग सावंत, हनुमंत मेलगे यासह अनेक जण उपस्थित होते.