बेळगाव : बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या टिळकवाडी येथील मराठी टीचर्स ट्रेनिंग (डीएड) कॉलेजच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला. डीएड प्रथम वर्षांमध्ये एकूण ४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामध्ये चापगावची कन्या मंगल मारुती कुकडोलकर, हिन विशेष गुणासह प्रथम आली आहे. त्याचप्रमाणे द्वितीय- रेणुका लक्ष्मण हावळ, तृतीय- सोनाली सोम्माणा हुंदरे, चौथा-अंजली सुनील जठार, पाचवा क्रमांक- संगीता नारायण निलजकर यांनी मिळविला. बीएड द्वितीय वर्षात प्रथम-पूजा रुक्माण्णा चाफळकर, द्वितीय-पूजा हणमंत मिराशी, तृतीय- प्रसाद दौलत कुंभार यांनी मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर, प्राचार्य एम. बी. हुंदरे यांचे प्रोत्साहन मिळत आहे. मंगल ही चापगाव येथील प्रगतशील शेतकरी मारुती यल्लाप्पा कुकडोळकर यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.