खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : चन्नेवाडी ता.खानापूर येथील रहिवासी व ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री.राजाराम ल.पाटील (आर.एल.गुरुजी) यांचा खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटनेतर्फे त्यांच्या चन्नेवाडी येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला, खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटना दरवर्षी पंच्याहत्तरी पार केलेल्या निवृत्त शिक्षकांचा सन्मान करते, नुकताच हा कार्यक्रम खानापूर येथे पार पडला, पण तब्बेतीच्या कारणास्तव रा.ल.गुरुजी उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यानि त्यांच्या चन्नेवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले,रा.ल.पाटील गुरुजी यांनी 1962 ते 1964 या काळात आपला टी. सी.एच.कोर्स पूर्ण केला, याचवेळी त्यांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. दयानंद बांदोडकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला, तर 1996 साली त्यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, खानापूर तालुक्यातील कोणकीकोप्प येथे 3 वर्षे, किरहलशी येथे, 3 वर्षे, हलगा येथे 15 वर्षे तर हलशी येथे 19 वर्षे सेवा बजावली व ते 1997 साली निवृत्त झाले, संघटनेतर्फे सत्कारावेळी अध्यक्ष श्री, डी. एम.भोसले, उपाध्यक्ष श्री.अनंत पाटील, एम.जी.घाडी व इतर पदाधिकारी उपस्थित राहून गुरुजींना दुर्घायुष्य चिंतिले व शुभेच्छा दिल्या. तर गुरुजींनी संघटनेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.