बेळगाव: येळुर येथील महाराष्ट्र राज्य येळुर हा फलक हतवल्या नंतर महाराष्ट्र राज्य उचगाव असा फलक लावल्या प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आठ कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी जे एम एफ सी चौथ्या न्यायालयाने समितीच्या आठ कार्यकर्त्यांनी निर्दोष मुक्तता केली.
महाराष्ट्र राज्य उचगाव असा फलक तयार करून उचगाव बस स्टँड जवळील विजेच्या खांबावर फलक लावून कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून काकाती पोलिसांनी मनोहर लक्ष्मण होनगेकर,अरुण आप्पाजी जाधव ,विवेक सुभाष गिरी,अनंत शंकर देसाई,संतोष गुंडू पाटील,गणपती शंकर पाटील,भास्कर कृष्णा कदम आणि राजेंद्र वसंत देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिकारी आर. टी.लखनगौडर यांनी सदर प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.पण न्यायालयात पोलीस कार्यकर्त्यावर गुन्हा शाबीत करू शकले नाहीत .त्यामुळे चौथ्या जे एम एफ सी न्यायालयाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी ची निर्दोष मुक्तता केली.समितीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अँड.महेश बिर्जे,अँड.एम.बी.बोंद्रे,अँड.बाळासाहेब कागणकर,अँड. वैभव कुट्रे यांनी न्यायालयात बाजू मांडली.