खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
शिवोली ता. खानापूर येथील प्रतिष्ठित नागरिक व महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे कार्यकर्ते निवृत्त मुख्याध्यापक गणपती विठ्ठल पाटील यांनी आज 86 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या या यशस्वी जीवनाच्या वाटचालीबद्दल खानापूर तालुका सेवा निवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिवोली गावी भेट देऊन त्यांना अभिष्टचिंतन केले. यावेळी तालुका निवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डी.एम. भोसले अनंत पाटील, घाडी गुरुजी, पवार गुरुजी सह सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण पाटील, राजाराम जांबोटकर, डॉ. तुकाराम पाटील, ईराप्पा पाटील, सुभाष पाटील, गुरुजींचे चिरंजीव भाऊसाहेब पाटील व त्यांचा परिवार उपस्थित होता.
श्रीयुत गणपती पाटील गुरुजी हे 1996 मध्ये आपल्या शिक्षेची सेवेतील निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात कायम स्वतःला खांदे कार्यकर्ते म्हणून झोपून दिले. आजही सीमा लढ्याबद्दल त्यांची तळमळ व समाजातील बांधिलकी व मनमिळावू पण हा त्यांचा अंगी कायम आहे. अशा या ज्येष्ठ व्यक्तीस त्यांच्या 86 वर्षानिमित्त अभिष्टचिंतन व त्यांना शत आयुष्य लाभो ही सदिच्छा.