खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
खानापुरात गेल्या 40 वर्षापासून कार्यरत असलेल्या देसाई गल्ली, घोडे गल्ली कॉर्नर वरील सिंडिकेट बँकेचे 2021 मध्ये कॅनरा बँकेत विलीनीकरण करण्यात आले. पण आता त्याच विलीनीकरण कॅनरा बँकेच्या शाखेचे मुख्य शाखा असलेल्या बेळगाव पणजी रोड वरील मराठा मंडळ ताराराणी हायस्कूलच्या कंपाउंड मध्ये असलेल्या कॅनरा बँक शाखेमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे. हे अत्यंत चुकीचे असून यामुळे खानापूर शहरातील व्यावसायिक तसेच ग्राहकांच्यावर अन्यायकारक आहे. यासाठी सदर कॅनरा बँक शाखेचे स्थलांतर करण्यात येऊ नये अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कॅनरा बँकेच्या हुबळी विभागीय सहाय्यक मुख्य व्यवस्थापक बी. रेणुका यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख कोचेरी, सर्वज्ञ कपलेश्वरी उपस्थित होते.
खानापूर घोडे गल्ली देसाई गल्ली कॉर्नर मधील कॅनरा बँक लवकरच बेळगाव पणजी रोडवरील शहरांतर्गत असलेल्या ताराराणी हायस्कूल गेट समोरील कॅनरा बँकेच्या शाखेत स्थलांतर होणार असल्याचे वृत्त दोनच दिवसांपूर्वी खानापूर लाईव्ह मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर तसेच खानापुरातील विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी हुबळी येथे थेट कॅनरा बँकेच्या हुबळी विभागीय मुख्य शाखेच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही स्वतःच्या लेटर पॅड वर कॅनरा बँक शाखेला विरोध करण्यास विरोध असल्याचे निवेदन दिले आहे. त्याशिवाय भारतीय किसान मंच कर्नाटक प्रदेश उत्तर प्रांत, खानापूर शाखेचे अध्यक्ष अशोकगौड पाटील, उपाध्यक्ष विद्यानंद बनोशी, दीपक वाळवे, एस एस बेडरे यांनी, तसेच भाग्यलक्ष्मी मल्टी. सोसायटी खानापूर यांच्या शिष्टमंडळाने हुबळी येथे गुरुवारी भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते सर्वज्ञ कपलेश्वरी यांनीही पंतप्रधान मोदीजींच्या नावे एक पत्र लिहून खानापुरातील सदर राष्ट्रीयकृत बँक असलेले कॅनरा बँकेची शाखा बंद करण्यात येऊ नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सामूहिकरित्या दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर शहरात गेल्या 40 वर्षापासून सदर बँक कार्यरत आहे यामुळे जवळपास 30,000 हून अधिक ग्राहक या बँकेची संलग्न आहेत. खानापूर शहरातील अनेक व्यापाऱ्यांची व्यवहारिक खाते ही या बँकेची संलग्न आहेत. शिवाय 25 ते 30 खेड्यांचा संबंध या बँकेची असल्याकारणाने आर्थिक व्यवहारही चांगले आहेत. आणि ही बँक या भागातील ग्राहकांना सोयीची आहे. यासाठी सदर बँक शाखा स्थलांतरित करण्यात येऊ नये अशी विनवणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
खानापूर लाईव्ह न्यूज वृत्ताची दखल…
खानापूर शहरातील कॅनरा बँकेच्या लीड बँकेने खानापुरात दोन शाखांची आवश्यकता नसल्याचे कारण पुढे करून खानापुरातील एक कॅनरा बँकेची शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तारारणी हायस्कूल कडील नव्याने झालेली कॅनरा बँक ही मुख्य बँक असल्याने याच बँकेत विलीनीकरण करावे लागणार असे वरिष्ठांचे वरिष्ठांनी आदेश दिले आहेत. तसे आदेशही वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या सिंडिकेट बँक व आताच्या कॅनरा बँकेची सलग्न असलेल्या ग्राहकांची मात्र आता मोठी गोची होणार आहे. यासाठी सदर बँक विलीनीकरणात विरोध व्हावा अशी मागणी खानापूर लाईव्ह मधून करण्यात आली होती या वृत्ताची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर सह खानापुरातील काही व्यवसायिक सह सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी हुबळी विभागीय सहाय्यक मुख्य व्यवस्थापकांना एक निवेदन देऊन स्थलांतरास विरोध दर्शवला आहे.